कलम ३७० हटवू शकता, मग मराठा आरक्षणासाठी अडथळे का?

“कलम ३७० हटवता, मग मराठा आरक्षण का नाही?” – राऊतांचा सवाल

कलम ३७० हटवू शकता, मग मराठा आरक्षणासाठी अडथळे का? – संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल

मुंबई : मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत

यांनी भाजपवर सडकून टीका केली आहे.

मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाच्या तिसऱ्या

दिवशी राऊतांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा

आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर थेट निशाणा साधला.

राऊत म्हणाले, “जे गृहमंत्री कलम ३७० हटवून जम्मू-काश्मीरचा प्रश्न सोडवू शकतात,

ते मराठा आरक्षणासाठी संविधानात बदल का करू शकत नाहीत?

मराठा समाजाला न्याय देण्याचं श्रेय घेण्याची संधी त्यांच्याकडे होती,

पण त्यांनी ती गमावली.”

अमित शहा यांच्यावर टीका

“देशाचे गृहमंत्री मुंबईत येऊनही जरांगे पाटील यांना भेटले नाहीत,

ही बाब निराशाजनक आहे.

शहा यांचा दौरा मराठा बांधवांची विचारपूस करण्यासाठी नव्हता,

तर मुंबईचा महापौर भाजपचा व्हावा हे सांगण्यासाठी होता,”

अशी टीका राऊतांनी केली.

शिंदे-फडणवीसांवर निशाणा

“शिंदे शेपटी हलवत शहांच्या मागे फिरतात.

मराठा आरक्षणासारखा गंभीर प्रश्न असताना ते दरे गावात यज्ञ करतात.

तुम्ही कसले मराठा? शिवाजी महाराजांचे नाव घेऊ नकाय.

फडणवीस कसले मराठे? हे लोक मराठी माणसासाठी कलंक आहेत,”

असा थेट हल्लाबोल राऊतांनी केला.

उदयनराजे-शिवेंद्रराजेंवरही टीका

“या गंभीर परिस्थितीत छत्रपती उदयनराजे आणि शिवेंद्रराजे

यांनी जरांगे पाटील यांच्यासोबत उपोषणाला बसायला हवे होते.

मात्र, दोघेही भाजपचे हस्तक बनले आहेत.

लोकप्रतिनिधी लोकप्रश्नांकडे दुर्लक्ष करून यज्ञ करत बसले,

हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे,” असे राऊत म्हणाले.

दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी सर्व शिवसैनिकांना

जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाणी,

अन्न व निवाऱ्याची मदत करण्याचे आवाहन केले आहे.

राऊतांच्या या जोरदार हल्ल्यामुळे मराठा आरक्षणाच्या

आंदोलनाला आता नवा राजकीय रंग मिळाल्याचे स्पष्ट होत आहे.

Read also : https://ajinkyabharat.com/manoj-jarange-yancha-sarkarla-nirvaniyach-gesture-udyasoon-kadak-upasha/