रिसोड – रिसोड तालुक्यात मागील काही दिवसांपासून ढगफुटीसारखा पाऊस सुरू
असल्यामुळे पैनगंगा नदीकाठच्या शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे.
यामध्ये सोलर पंप, मोटार, पाईप तसेच इतर शेती साहित्य पाण्यात वाहून गेले आहे.
शेतकऱ्यांनी शासनाकडे त्वरित मदतीची मागणी केली आहे.
खडकी सदार परिसरात 16 ते 18 ऑगस्ट दरम्यान झालेल्या
अतिवृष्टीमुळे पैनगंगा नदीवर भरपूर पूर आला.
सर्व्हे क्रमांक 105 मधील शेतकऱ्यांचे सोलर पंप व इतर साहित्य वाहून गेले.
नदाबाई भागवत बोडखे व इतर शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे.
शेतकऱ्यांनी महागडी औषधे फवारून पीक वाचवण्याचा प्रयत्न केला,
मात्र पावसामुळे तो खर्च वाया गेला. पिकाबरोबरच सोलर पंप, मोटार,
स्प्रिंकलर अशा महागड्या साहित्याच्या नुकसानामुळे शेतकरी गंभीर आर्थिक संकटात सापडला आहे.
शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की, शासनाने त्वरित पंचनामा करून मदत करावी.
Read also : https://ajinkyabharat.com/muthi-baatmi-manoj-jarange-patilchan-movement-udayahi-suru-rahanar/