मुर्तिजापुर – राष्ट्रीय क्रीडा दिवस व हॉकीचे जादूगार
मेजर ध्यानचंद यांची जयंती निमित्त मुर्तिजापुरमध्ये विविध
उपक्रम राबवण्यात आले. मेरा युवा भारत अकोला,
तालुका क्रीडा कार्यालय मुर्तिजापुर, श्री गाडगे महाराज विद्यालय,
कनिष्ठ विज्ञान महाविद्यालय, एनरजेटीक फिटनेस क्लब,
नेहरू युवा बँक, क्रीडा व सांस्कृतिक मंडळ कोकणवाडी
यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम पार पडला.
कार्यक्रमांत अभिवादन समारंभ, वृक्षारोपण, क्रीडा शिक्षक
व प्रशिक्षकांचा सन्मान, पर्यावरण संदेश देत सायकल रॅली
आणि वृक्ष संगोपनासह अनेक उपक्रम राबवण्यात आले.
शंकर नगर येथे वृक्षारोपणासोबत झाडाच्या फादयांची छाटणी केली गेली,
तसेच क्रीडा शिक्षक व प्रशिक्षकांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी सुनील व्हरेकर, र्किती कुमार जयस्वाल यांचा सन्मान झाला.
सायकल रॅलीमार्फत जनजागृती केली गेली.
रॅलीला श्री गाडगे महाराज विद्यालय मंडळाचे सचिव शिरीश भाऊ तिडके
यांनी हिरवी झेंडी दाखवून प्रारंभ केला, आणि भगतसिंग चौक,
आठवडी बाजार मार्गे तालुका क्रीडा कार्यालय येथे समारोप झाला.
प्रास्ताविक विलास वानखेडे यांनी केले, तर कमलाकर भाऊ गावंडे यांनी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमास प्राचार्य विलास खाडे, पर्यावरणरक्षक श्याम कोल्हाडे,
समाजसेवक समाधान इंगळे, रमेश दर्मानी, रितेश साबजवार, बाळासाहेब खांडेकर,
तसेच तालुका क्रीडा कार्यालयाचे विनोद काळबांडे, दिलीप गोसावी,
संजय गिरी उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते सहभागींचे प्रमाणपत्र वितरण करण्यात आले.
उपक्रमात विशाल वानखडे, अक्षय भागवत, वैभव मालठाने,
तोसिफ शेख, पल्लवी गिरी, कोमल वाकोडे, विभाष वानखडे यांनी सक्रिय सहभाग नोंदवला.
कार्यक्रमाचे संचालन व आभार विलारा वानखडे यांनी व्यक्त केले.