अमित शाहांच्या विमानात बिघाड
मुंबई – केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी मुंबईतील दोन दिवसीय दौरा पूर्ण केला.
यावेळी त्यांनी राज्यातील राजकीय घडामोडी,
भाजप नेते व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासमवेत महत्त्वाची चर्चा केली.
मराठा आरक्षणाचाही मुद्दा चर्चेत आला.
मुंबईत लालबागच्या राजाचे दर्शन घेतल्यानंतर शाह सहकुटुंब गुजरातकडे रवाना होत होते.
मात्र, विमानतळावर आल्यावर त्यांच्या सरकारी
विमानात तांत्रिक बिघाड झाल्याचे समोर आले.
यावेळी उपमुख्यमंत्री शिंदे यांचे पुणे दौऱ्यासाठी चार्टर्ड विमान विमानतळावर उभे होते.
परिस्थितीची जाण होताच, शिंदेंनी आपले विमान गृहमंत्र्यांच्या सेवेसाठी देऊ केले.
अखेर अमित शाह सहकुटुंब एकनाथ शिंदेंच्या विमानातून गुजरातला रवाना झाले.
दरम्यान, शाह यांनी कुटुंबासह लालबागच्या राजाचे दर्शन घेतले.
यावेळी त्यांनी आपल्या नातवाला कडेवर घेतलेले क्षण पाहून
भक्तांनी आजोबा-नातवाच्या नात्यातील प्रेमळ झलक अनुभवली.
राजकीय प्रतिक्रिया
“गृहमंत्र्यांनी आंदोलकांकडे पाठ फिरवली” – संजय राऊत
गणेशोत्सवाच्या काळात लाखो मराठी
बांधव मराठा आरक्षणासाठी पावसात आंदोलन करत आहेत.
अमित शाह यांनी जनता रुपी पांडुरंगाला भेट दिली नाही,
अशी टीका खासदार संजय राऊत यांनी ट्विट करून केली.
Read also : https://ajinkyabharat.com/rahul-dravid-rajasthan-royalschan/