IPL 2026 : मोठी ऑफर नाकारल्याने चर्चांना उधाण
मुंबई : महान क्रिकेटपटू राहुल द्रविड आणि राजस्थान रॉयल्सचं नातं अखेर संपुष्टात आलं आहे.
आयपीएल 2026च्या तोंडावर शनिवारी (30 ऑगस्ट)
फ्रँचायझीनं ही घोषणा केली.
द्रविड यांची सप्टेंबर 2024 मध्ये राजस्थान रॉयल्सचे
मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती झाली होती.
मात्र त्यांच्या मार्गदर्शनाखाली आयपीएल 2025 मधील संघाची कामगिरी निराशाजनक ठरली.
राजस्थानने 14 पैकी फक्त 4 सामने जिंकत पॉईंट टेबलमध्ये नववा क्रमांक पटकावला होता.
मोठी ऑफर नाकारली
राजस्थान रॉयल्सने सोशल मीडियावर जाहीर केले की,
फ्रँचायझीच्या स्ट्रक्चरल रिव्ह्यूचा भाग म्हणून राहुल द्रविड यांना वेगळ्या पदाची
मोठी ऑफर देण्यात आली होती.
मात्र त्यांनी ती नाकारत संघासोबतची वाटचाल थांबवण्याचा निर्णय घेतला.
रॉयल्सचा गौरव
“राहुल द्रविड अनेक वर्षांपासून राजस्थान रॉयल्सच्या प्रवासाच्या केंद्रस्थानी राहिले आहेत.
त्यांच्या नेतृत्वाने खेळाडूंच्या एका पिढीला प्रभावित केले
आणि फ्रँचायझीच्या संस्कृतीवर ठसा उमटवला आहे.
त्यांच्या योगदानाबद्दल आम्ही मनःपूर्वक आभारी आहोत,”
असे राजस्थान रॉयल्सने म्हटले आहे.
पुढील पाऊल काय?
आता द्रविड पुढे कोणत्या भूमिकेत दिसतील,
याकडे क्रीडाजगताचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, राजस्थान रॉयल्स नवीन हेड कोचच्या शोधाला सुरुवात करणार असल्याची चर्चा आहे.
Read also : https://ajinkyabharat.com/muthi-baatmi-maratha-reservation-question-question-mothi-halchal/