पातुर तालुक्यातील घटना, तहसीलदारांचा नागरिकांना इशारा
पातुर – तालुक्यातील पिंपळखुटा-चांगेफळ परिसरातील
“मन” नदीपात्रात शनिवारी सकाळी दुर्दैवी घटना घडली.
पोहण्यासाठी गेलेल्या तीन तरुणांपैकी करण वानखडे
(वय २४) हा तरुण नदीच्या प्रचंड पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला.
गेल्या दोन दिवसांपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे “मन” नदीला पूर आला आहे.
नदीच्या पाण्याचा अंदाज न आल्याने करण वानखडे हा पुराच्या पाण्यात अडकून वाहून गेला.
या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
सध्या अकोला जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभाग,
काटेपूर्णाचे वंदे मातरम पथक आणि बाळापूर येथील
संत मच्छिंद्रनाथ आपत्कालीन पथक यांच्या मदतीने शोधकार्य सुरू आहे.
गेल्या तीन तासांपासून तरुणाचा शोध सुरू असून
अजूनही त्याचा काहीच मागमूस लागलेला नाही.
दरम्यान, तहसीलदार डॉ. राहुल वानखेडे यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की,
“नदी-नाल्याच्या वरून पाणी वाहत असताना कोणत्याही
नागरिकांनी पाण्यात जाण्याचे धाडस करू नये,
अन्यथा जीवितहानीची शक्यता निर्माण होते.”
Read also : https://ajinkyabharat.com/shetat-tabbal-12-ft-ft-pantan-python-gramastha-bheethe-environment/