शिवसंग्रामची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी
पातुर/अकोला : मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे
अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
हजारो हेक्टर शेती पाण्याखाली गेल्याने पीकहानी झाली असून काही ठिकाणी घरांचे,
पशुधनाचे व जीवितहानीचेही प्रकार घडले आहेत.
या पार्श्वभूमीवर शिवसंग्रामच्या वतीने जिल्हाधिकारी अकोला
यांना तातडीने नुकसानभरपाई देण्याची मागणी करण्यात आली.
जिल्हाध्यक्ष दिलीप परनाटे यांच्या नेतृत्वाखाली १८ ऑगस्ट २०२५ रोजी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
परनाटे यांनी सांगितले की, “महसूल मंडळनिहाय तातडीने पाहणी करून शेतकरी,
घरकुलधारक तसेच जनावरांच्या नुकसानीची नोंद घेऊन लवकरात लवकर नुकसानभरपाई द्यावी.
शासनाने शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहावे,” अशी मागणी करण्यात आली आहे.
शिवसंग्रामच्या या निवेदनाद्वारे शेतकऱ्यांचे हाल मांडण्यात आले असून,
अवकाळी पावसामुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने दिलासा देण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.
Read also : https://ajinkyabharat.com/gharat-jastit-jast-kiti-rokad-padvu-shakta/