तरीही सध्या बंदी नाही, ट्रम्प म्हणाले – “टॅरिफ हटवल्यास अमेरिका उद्ध्वस्त होईल!”
वॉशिंग्टन :अमेरिकन अपील कोर्टाने माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प
यांच्याद्वारे लावण्यात आलेले टॅरिफ बेकायदेशीर ठरवले आहे.
मात्र, या निर्णयाला तत्काळ स्थगिती देण्यात आली असून
ऑक्टोबरपर्यंत टॅरिफ कायम राहणार आहे.
कोर्टाने स्पष्ट केले की 1974 च्या व्यापार कायद्याअंतर्गत ट्रम्प 150
दिवसांसाठी 15 टक्क्यांपर्यंतच टॅरिफ लादू शकतात
आणि त्यासाठी ठोस कारण आवश्यक आहे.
ट्रम्प यांनी 2017 मध्ये आपत्कालीन अधिकारांचा वापर करून चीन,
कॅनडा, मेक्सिको यांसारख्या देशांवर 10 ते 50 टक्क्यांपर्यंत टॅरिफ लादले होते.
त्यांनी व्यापार तूट, औषधांची तस्करी व बेकायदेशीर घुसखोरी रोखण्याचे कारण दिले होते.
कोर्टाने मात्र स्पष्ट केलं की,
ट्रम्प यांना प्रत्येक आयातीवर अमर्याद टॅरिफ लावण्याचा अधिकार नाही.
दरम्यान, भारतावर 50 टक्के शुल्क लादण्यात आले असून ते 27 ऑगस्टपासून लागू झाले आहे.
ग्लोबल ट्रेड रिसर्च इनिशिएटिव्ह (GTRI) च्या अहवालानुसार,
यामुळे भारताच्या सुमारे 5.4 लाख कोटी रुपयांच्या निर्यातीवर परिणाम होऊ शकतो.
रत्ने-दागिने, कपडे, फर्निचर, सीफूड यांसारख्या उत्पादनांच्या
किंमती वाढल्यामुळे त्यांची मागणी 70 टक्क्यांनी घटण्याची शक्यता आहे.
ट्रम्प यांनी भारतावर हे शुल्क रशियाकडून होणाऱ्या तेल खरेदीमुळे लावले आहे
. 2023 मध्ये भारत रशियाकडून दररोज 20 लाख बॅरल तेल आयात करत होता.
2025 मध्ये ही मात्रा सरासरी 17.8 लाख बॅरलवर कायम आहे.
गेल्या दोन वर्षांत भारताने 130 अब्ज डॉलर्सपेक्षा (11.33 लाख कोटी रुपये)
जास्त रशियन तेल खरेदी केले आहे.
ट्रम्प यांनी कोर्टाच्या निर्णयावर प्रतिक्रिया देताना म्हटले की,
“जर हे टॅरिफ काढून टाकले गेले तर अमेरिका उद्ध्वस्त होईल.
सर्व टॅरिफ अजूनही लागू आहेत आणि शेवटी अमेरिका जिंकेल.”