मुर्तीजापुर – श्री गाडगे महाराज महाविद्यालयाच्या समाजशास्त्र विभागाच्या
वतीने तारुण्यावस्थेतील विद्यार्थ्यांसाठी समुपदेशन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरवात गाडगेबाबांच्या प्रतिमेसमोर दीपप्रज्वलन करून झाली.
मुख्य उपस्थित मान्यवर
निनाद बुलबुले, समुपदेशक, लक्ष्मीबाई रुग्णालय, मुर्तीजापुर
प्रा. डॉ. मनिषा यादव
डॉ. अनिल ठाकरे
प्रा. राजेन्द्र वाकडे
विद्यार्थ्यांनी पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांचे स्वागत केले.
प्रास्ताविक प्रा. राजेंद्र वाकडे यांनी केले.
कार्यशाळेचा उद्देश
कार्यशाळेत तारुण्यावस्थेतील मुलांना येणाऱ्या ताण-तणावाची योग्य माहिती देणे,
त्याचे परिणाम समजावणे आणि जीवन तणावमुक्त कसे ठेवता येईल, हे सांगणे हेदेखील उद्देश होते.
प्रस्तुत केलेल्या महत्त्वाच्या मुद्द्यांची माहिती
निनाद बुलबुले यांनी ताण-तणाव कमी करण्यासाठी सोपे व्यायाम,
आसने, एड्सची माहिती, लक्षणे, कारणे व प्रतिबंध याबाबत मार्गदर्शन केले.
डॉ. मनिषा यादव यांनी विद्यार्थ्यांना शारीरिक बदलाबाबत जागरूक राहण्याचे
आणि अभ्यास, करिअरमध्ये ताण न घेता आरोग्यपूर्ण जीवन जगण्याचे महत्त्व पटवून दिले.
डॉ. अनिल ठाकरे यांनी सोशल मीडिया वरील माहितीवर फार विश्वास ठेवू नये,
ती एक मोहजाल आहे, याबाबत सतर्क राहण्याचे आवाहन केले.
उपस्थिती आणि संचालन
कार्यक्रमात महाविद्यालयातील बहुसंख्य विद्यार्थी,
शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
प्रा. विजय बेलखेडे, प्रा. एस. शामसुंदर, प्रा. नरेश बनसोड,
डॉ. अर्चना गायकवाड, डॉ. कांचन मिसाळ, डॉ. तायडे,
प्रा. भारती बाजड, प्रा. सुप्रिया इंगोले, प्रा. श्रीया ताबंडे ह्यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे संचालन डॉ. बनसोडे यांनी केले आणि आभार विद्यार्थिनी राधा गिरी यांनी मानले.
Read also : https://ajinkyabharat.com/ganeshotsav-and-eid-e-milad-safe-cross-padanyasathi-special-arrangements/