ग्राम मनभा येथे गणेशोत्सव आणि ईद-ए-मिलाद निमित्त
परिसरात शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी
विशेष पथसंचलन करण्यात आले.
ही मोहीम उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाडवी
यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण पोलीस स्टेशन कारंजा अंतर्गत राबवली गेली.
गणेशोत्सव मंडळाच्या वतीने गावात गणपतीची स्थापना करण्यात आलेली असून,
विसर्जन मिरवणुकीदरम्यान तसेच ईद-ए-मिलाद कार्यक्रम शांततेत पार पाडले जावेत,
यासाठी मनभा येथील प्रमुख मार्गावर पोलीसांनी पथसंचलन केले.
पथसंचलनामध्ये सहभागी अधिकारी व कर्मचारी
उपविभागीय पोलीस अधिकारी : प्रदीप पाडवी
ठाणेदार : प्रवीण शिंदे
सहाय्यक पोलीस निरीक्षक : मुकुंद जाधव
पो उपनि : चव्हाण
PSI : अमोल चाटे
यासोबतच आरसीपी, QRT, SRPF प्लाटून, ग्रामीण पोलीस स्टेशन कारंजा,
होमगार्ड सैनिक आणि महिला कर्मचारी जवानही सहभागी झाले.
तसेच मनभा बीड येथील जमादार गब्बर पप्पू वाले,
सुमित जगताप आणि इतर सहकारी मंडळी देखील या पथसंचलनामध्ये सहभागी झाले.
या व्यवस्थेमुळे गणेशोत्सव व ईद-ए-मिलादाचे कार्यक्रम शांततेत पार पाडणे सुनिश्चित झाले,
तसेच नागरिकांचे सुरक्षिततेचे भान राखले गेले.
Read also :https://ajinkyabharat.com/kamargavathail-shetkyancha-environmental-undertaking/