ढगफुटीसदृश्य पावसात महावितरणची तत्परता; अकोल्यातील नागरिकांना दिलासा
अकोला- अकोला जिल्ह्यात गुरुवारी झालेल्या ढगफुटीसदृश्य मुसळधार
पावसामुळे महावितरण कंपनीला मोठे नुकसान झाले.
या पावसात १३२ के.व्ही. गौरक्षण उपकेंद्रातून निघणाऱ्या ११ के.व्ही. चित्राफीडरवरील
एक विद्युत खांब कोसळला,
तसेच काही ठिकाणी झाडे पडल्याने वीज पुरवठा खंडित झाला.
विशेषत: मध्यवर्ती कारागृहाजवळील जेलरोड व क्वार्टर एरिया परिसरात
झाडे व खांब रस्त्यावर पडल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण
झाला आणि नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागला.
कार्यकारी अभियंता हेमंत पावडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक
अभियंता निखिल गवळी आणि त्यांचे पथक घटनास्थळी धाव घेतले.
जनमित्र सागर राठोड, गोपाल गावंडे, निखिल धाकुलकर, जितेंद्र खिराडे,
गणेश धारपवार व सदाशिव यांनी तत्परतेने
पडलेली झाडे व खांब हटवून रस्ता मोकळा केला.
त्यांच्या वेळेवर व तत्पर कार्यवाहीमुळे परिसरातील नागरिकांना दिलासा मिळाला.
इतर भागांमध्येही वीज खांब पडल्याने काही काळ वीज पुरवठा बंद होता,
मात्र महावितरणने टप्या-टप्प्याने काम करत वीज पुरवठा पुन्हा सुरु केला.
मुख्य अभियंता राजेश नाईक महावितरणच्या परिस्थितीवर लक्ष ठेवत आहेत.
महावितरणने नागरिकांना संयम बाळगून सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे,
विशेषत: अशा मुसळधार पावसाच्या काळात.