आपत्कालीन शोध-राहत कार्य सुरू
मुर्तीजापुर तालुक्यातील कंझरा परिसरात आज सकाळपासून
मुसळधार पावसामुळे कमळगंगा नदीवर पूर आला.
शेतमजुरीसाठी गेलेली 34 वर्षीय रेखा मते या पाण्याच्या
प्रवाहात वाहून गेल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली.
तिच्या 12 वर्षीय मुली साक्षी मतेला पाण्यातून बचाव मिळाला
आणि तिने काटेरी झुडपाचा आधार घेऊन आपले प्राण वाचवले.
या दुर्घटनेनंतर तहसीलदार शिल्पा बोबडे, ठाणेदार श्रीधर गुट्टे,
दीपक कानडे यांचे मार्गदर्शनाखाली वीर भगतसिंग आपत्कालीन
शोध व बचाव पथक घटनास्थळी तैनात केले आहे.
विजय माल्टे, शाहबाज शहा, मोहन वाघमारे, उमेश माल्टे, अक्षय मोरे,
शुभम दामोदर, शेख वसीम, दिनेश श्रीनाथ आणि जवान कमळगंगा
नदीमध्ये वाहून गेलेल्या महिलेचा शोध घेत आहेत.
सकाळपासून सुरू असलेल्या पावसामुळे परिसरात नागरिकांच्या
सुरक्षिततेस धोका निर्माण झाला असून प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.