अकोट : सातपुड्याच्या पायथ्याशी वसलेल्या अकोट ते पोपटखेड रोडवरील
श्री संत गजानन महाराज सजल विहीर संस्थान, शांतीवन अमृततीर्थ
येथे गुरुवार, भाद्रपद शुक्ल पंचमीला संत गजानन महाराज समाधी सोहळा
व ऋषिपंचमी उत्सव मोठ्या भक्तीमय वातावरणात साजरा झाला.
सकाळपासूनच भक्तांनी विहीर परिसर भरून टाकला होता.
सकाळी सहा वाजता अभिषेक, सात वाजता आरती,
आणि आठ वाजता रजत मुखवट्याच्या पालखीची नगर परिक्रमा
टाळ-मृदुंग व अभंगांच्या गजरात पार पडली.
दर्शनासाठी परिसरात हजारो भाविक उपस्थित होते.
दहा वाजता विशाल महाराज बड यांचे हरीकीर्तन,
तर ११ वाजता महाआरती संपन्न झाली.
भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला आणि दुपारी चार
वाजेपर्यंत भव्य महाप्रसाद वितरण अखंड सुरू राहिले.
सजल विहीर व ‘श्रीं’च्या रूपाचे दर्शन घेण्यासाठी सकाळपासून
भक्तांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
भक्तांनी ‘गण गण गणात बोते’ असा मंत्र जागर करून परिसराला चैतन्याने भरून टाकले.
समाधी सोहळ्यासाठी मंदिर व विहीर परिसर आंब्याची पाने,
केळीचे खांबहार, फुले व पताका यांनी आकर्षकपणे सजवण्यात आले होते.
मंदिर समितीच्या माहितीनुसार, अंदाजे २० हजाराहून अधिक भक्तांनी
दर्शनासाठी हजेरी लावली.
read also :https://ajinkyabharat.com/mangrupeer-yethil-vadhankar-family-family-operation-sindoor-chakhawa/