गणरायाच्या चरणी संकटातून मार्ग काढण्याची मनोभावे प्रार्थना
मंगरुळपीर – गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मंगरुळपीर येथील
रुपेश वाढणकर व अर्चना वाढणकर यांनी देशभक्तीची
भावना जागवणारा आगळावेगळा देखावा साकारला आहे.
नुकत्याच झालेल्या पहलगाम दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून
भारत सरकारने राबवलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’ चे दर्शन या देखाव्यात घडविण्यात आले.
२० एप्रिल २०२५ रोजी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी
हल्ल्यात २६ निरपराध पर्यटकांचा मृत्यू झाला होता.
या हल्ल्यानंतर राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) मोठी कारवाई करत श्रीनगरमध्ये ६० हून
अधिक ठिकाणी छापेमारी केली. पाकिस्तान समर्थित लष्कर-ए-तैयबा
दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ओव्हर ग्राउंड वर्कर नेटवर्कचा भांडाफोड करण्यात आला.
काहींना अटकही करण्यात आली. यानंतर सरकारने ऑपरेशन सिंदूर राबवून शत्रूला ठोस प्रत्युत्तर दिले.
या घटनाक्रमावर आधारित आकर्षक देखावा वाढणकर परिवाराने गणेशोत्सवात उभारला असून,
परिसरातील नागरिकांकडून त्यांचे कौतुक होत आहे.
गणेश चतुर्थीचे औचित्य साधून वाढणकर परिवाराने या
देखाव्याद्वारे गणरायाच्या चरणी एकच प्रार्थना केली –
“प्रत्येक संकटातून निघण्याचे बळ दे आणि देशाच्या संकटांचे हरण कर.”
गणेशपूजेने कष्ट दूर होतात, सौभाग्य वाढते आणि संकटांचा नाश होतो असा श्रद्धाळूंचा विश्वास आहे.
वाढणकर परिवाराने या विश्वासाला मूर्त रूप देत देशाच्या संरक्षणासाठी गणरायाकडे साकडे घातले आहे.
read also :https://ajinkyabharat.com/mahavitranchaya-nishpanajipanacha/