१ सप्टेंबरपासून मुंबई-हावडा दुरांतो एक्सप्रेसला अकोल्यात थांबा! खासदार अनुप धोत्रे यांच्या प्रयत्नांना यश

मुंबई–हावडा दुरांतो एक्सप्रेसला अखेर थांबा

अकोला – अकोल्यातील प्रवाशांसाठी मोठी आनंदवार्ता आहे.

खासदार अनुप धोत्रे यांच्या पाठपुराव्यामुळे रेल्वे मंत्रालयाने

मुंबई-हावडा दुरांतो एक्सप्रेसला (गाडी क्र. १२२६१/१२२६२) अकोला जंक्शन येथे

प्रायोगिक थांबा मंजूर केला आहे.

हा थांबा १ सप्टेंबर २०२५ पासून पुढील आदेश येईपर्यंत सुरू राहणार आहे.

 गाडीची वेळ :

  • मुंबई ते हावडा (गाडी क्र. १२२६१): अकोला येथे रात्री ००:४० वाजता आगमन व ००:४२ वाजता प्रस्थान.

  • हावडा ते मुंबई (गाडी क्र. १२२६२): अकोला येथे रात्री २३:५३ वाजता आगमन व २३:५५ वाजता प्रस्थान.

 प्रवाशांना दिलासा

आठवड्यातून चार दिवस धावणाऱ्या दुरांतो एक्सप्रेसला थांबा मिळाल्याने

अकोल्यातील प्रवाशांना मुंबई व हावडा येथे कमी वेळेत

आणि कमी थांब्यांत पोहोचण्याची सोय होणार आहे.

अकोल्यात अनेक कलकत्ता भागातील नागरिक वास्तव्यास आहेत,

त्यांच्यासाठी ही मोठी सुविधा ठरणार आहे.

तसेच मुंबईला रात्री प्रवास करून सकाळी पोहोचण्याची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे.

 १६ वर्षांची प्रतीक्षा संपली

हावडा-मुंबई दुरांतो एक्सप्रेस २८ सप्टेंबर २००९ रोजी सुरू झाली होती.

जवळपास १६ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अकोल्याला हा थांबा

मिळाल्याने प्रवाशांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

खासदार अनुप धोत्रे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी,

रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव व रेल्वे बोर्डाचे आभार मानले आहेत.

read also :  https://ajinkyabharat.com/mangrupeer-yethil-vadhankar-family-family-operation-sindoor-chakhawa/