बेंगळुरू – हुंडा प्रथा अजूनही कित्येक संसार उद्ध्वस्त करत आहे.
केवळ २७ वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनिअर शिल्पा पंचांगमथ
हिने हुंड्याच्या सततच्या छळाला कंटाळून आत्महत्या केली.
मृत्यूच्या वेळी ती दीड महिन्यांची गर्भवती होती आणि
तिच्या मागे अवघ्या दोन वर्षांचा मुलगा आहे.
या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
विवाह आणि हुंड्याची मागणी
५ डिसेंबर २०२२ रोजी शिल्पाचा विवाह गंगावती तालुक्यातील
वड्डरहट्टी येथील प्रवीणशी झाला होता.
या विवाहासाठी शिल्पाच्या कुटुंबाने तब्बल ३५ लाख रुपये खर्च केला होता.
याशिवाय प्रवीणला १५ तोळ्यांचे दागिने देखील देण्यात आले.
मात्र, इतक्यावर समाधान न मानता प्रवीण व त्याची आई शांताव
यांनी आणखी ५ लाख रुपयांची मागणी केली.
पैसे न दिल्यास शिल्पाला मानसिक आणि शारीरिक छळ सहन करावा लागत होता.
छळ, वाद आणि अखेरचा शेवट
प्रवीण लग्नाआधी एका नामांकित आयटी कंपनीत कार्यरत होता.
पण लग्नानंतर त्याने नोकरी सोडून पाणीपुरी विकण्याचा व्यवसाय सुरू केला.
या काळात दाम्पत्यामध्ये वाद वाढत गेले.
चार महिन्यांपूर्वी शिल्पाच्या बेबी शॉवरच्या चर्चेतून मोठा वाद झाला.
२६ ऑगस्ट रोजी अचानक शिल्पाच्या कुटुंबाला तिच्या आत्महत्येची माहिती मिळाली.
घरी पोहोचल्यावर शिल्पाचा मृतदेह बेडवर चादरखाली आढळला.
आत्महत्येची कोणतीही चिठ्ठी पोलिसांना मिळालेली नाही.
मात्र आई शारदा यांनी दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी
पती प्रवीणला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.
या घटनेमुळे पुन्हा एकदा हुंडा प्रथेचा बळी समाजासमोर आला आहे.
read also : https://ajinkyabharat.com/disadvantage-2/