अवैध दारू विक्रीवर धाड, 3070 रुपयांचा मुद्देमाल जप्त

अवैध दारू अड्ड्यावर पोलिसांची धाड

 अवैध दारू विक्रीवर धाड, 3070 रुपयांचा मुद्देमाल जप्त

अकोला जिल्ह्यातील अवैध धंद्यांवर आळा घालण्यासाठी पोलिसांकडून

‘ऑपरेशन प्रहार’ मोहीम राबविली जात असून,

या मोहिमेअंतर्गत उरळ पोलीस स्टेशन हद्दीत मोठी कारवाई करण्यात आली.

या कारवाईत पोलिसांनी अवैध देशी दारू विक्री करणाऱ्या

आरोपीकडून एकूण ₹3070 किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

घटनेविषयी माहिती अशी की, दि. 29 ऑगस्ट 2025 रोजी दुपारी 12 वाजताच्या

सुमारास पोलिस पथक गणेशोत्सव बंदोबस्ताच्या अनुषंगाने गस्त घालत

असताना ठाणेदार पंकज कांबळे यांना गुप्त माहिती मिळाली.

माहितीप्रमाणे, ग्राम निमकरदा येथील युवराज गजानन इंगळे (वय 36, रा. निमकरदा, ता. बाळापूर)

हा आपल्या झोपडीतून देशी दारूची अवैध विक्री करत होता.

यावरून पोलिसांनी पंचांच्या उपस्थितीत झोपडीवर छापा टाकला

असता इंगळे हा प्रत्यक्ष विक्री करताना आढळून आला.

पाहणी केली असता त्याच्याकडून देशी दारू सखु संत्रा कंपनीचे 180 एमएल

चे 28 क्वार्टर (₹2520 किंमत) व सखु संत्रा हाऊबस आलोच प्रीमियम कंपनीचे

90 एमएल चे 11 काऊंटर (₹550 किंमत)

असा एकूण ₹3070 किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या प्रकरणी आरोपी युवराज इंगळे याच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी

कायद्यान्वये गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्री. अर्चित चांडक,

अपर पोलीस अधीक्षक बी. चंद्रकांत रेड्डी,

उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन पडघन

यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार एपीआय पंकज कांबळे,

पीएसआय गणेश कायंदे, पोलीस कर्मचारी रघुनाथ नेमाडे,

विकास वैद्यकर तसेच होमगार्ड जवान यांनी केली.

read also : https://ajinkyabharat.com/konachaya-patheimane-ulthapalath-uddhav-thakkari-vahadli-state-khabal/