मुंबई – मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी आज सकाळी 10 वाजतापासून
आझाद मैदानात बेमुदत उपोषण सुरू केले.
उपोषणादरम्यान जरांगे यांनी स्पष्ट केले की,
“आलेल्या सर्व गाड्या पार्किंगमध्येच ठेवा,
रोडवर कोणीही गाडी लावू नका, पोलीस सहकार्य करत आहेत.
मुंबईकरांना कुठल्याही त्रास होऊ देऊ नका, ते आपलेच आहेत.”
जरांगे यांनी आपल्या मागण्यांबाबत सरकारकडे संदेश दिला,
“मुख्यमंत्री साहेब, मराठ्यांचे मन जिंकण्यासाठी तुम्हाला सुवर्ण संधी आहे.
आमच्या मागण्यांचा सम्मान करा. मला गोळ्या घातल्या,
जेलमध्ये टाकले तरी समाजासाठी मी त्याचा स्वीकार करेल.
” त्यांनी उपोषणादरम्यान सांगितले की,
“आता अंगावर गुलाल पडल्याशिवाय मी इथून उठणार नाही.”
सरकारकडून पहिली प्रतिक्रिया समोर आली असून,
मंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की जरांगे यांनी दिलेले निवेदन
उपसमितीकडे प्राप्त झाले असून त्यावर चर्चा सुरू आहे.
विखे हे मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष आहेत.
मुंबईत उपोषणामुळे आझाद मैदानाजवळ वाहतूक मंदावली आहे,
काही रस्त्यांवर वाहनांची गर्दी झाली आहे.
प्रशासन आणि पोलीस अधिकाऱ्यांनी परिसरात तैनात राहून शांतता राखण्याचे प्रयत्न केले.
जरांगे यांच्या बेमुदत उपोषणामुळे मुंबईतील व्यवस्थेवर ताण निर्माण झाला आहे.
सरकारने जरांगे यांच्या मागण्यांकडे सहानुभूतीने
पाहिले असून आवश्यक प्रशासनिक आणि कायदेशीर कार्यवाही सुरू आहे.
Read also :https://ajinkyabharat.com/akola-shaharat-dividers-kamatil-nisanjipana-vehicle-flash-stroke/