अकोला- शहरात अग्रसेन चौक ते स्टेशन चौक मार्गावर
डिव्हायडरच्या कामातील निष्काळजीपणा नागरिकांसाठी धोकादायक ठरला.
रात्री ( दि .२८ ) रोजी साधारण ११:३० वाजता
टाटा एस गाडी (MH 04 GF 1681) विद्युत खांबावर आदळून
डिव्हायडरच्या खड्ड्यात कोसळली. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही,
पण मोठा अपघात टळला.
स्थानिक नागरिकांनी महानगरपालिका,
ठेकेदार आणि विद्युत विभागावर आरोप केला की,
कामाच्या ठिकाणी योग्य सुरक्षा उपाय, सूचना फलक,
बॅरिकेड्स व प्रकाशयोजना का उपलब्ध नाही?
रात्री लाइट बंद असल्यामुळे खड्डा दिसत नसल्याने अपघाताची शक्यता अधिक वाढते.
नागरिकांचे म्हणणे आहे की, नेहमी या मार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनधारकांची सुरक्षितता धोक्यात आहे.
प्रशासनाने या निष्काळजीपणाची गंभीर दखल घेत
आवश्यक ती तातडीची उपाययोजना करावी,
अन्यथा अजून मोठ्या अपघाताची भीती आहे.
Read also :