‘डॅडी’ अखेर तुरुंगाबाहेर; जामसंडेकर हत्या प्रकरणात अरुण गवळीला सुप्रीम कोर्टाचा जामीन

76

‘डॅडी’ अखेर तुरुंगाबाहेर; जामसंडेकर हत्या प्रकरणात अरुण गवळीला सुप्रीम कोर्टाचा जामीन

मुंबई – शिवसेना नगरसेवक कमलाकर जामसंडेकर यांच्या

हत्येच्या प्रकरणात अटक झालेल्या अंडरवर्ल्ड डॉन व माजी

आमदार अरुण गवळीला सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.

तब्बल १८ वर्षांच्या कारावासानंतर गवळीच्या सुटकेचा मार्ग मोकळा झाला आहे.

सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एम. एम. सुंदरेश आणि न्यायमूर्ती कोटिश्वर सिंह

यांच्या खंडपीठाने गवळीला दीर्घकाळ तुरुंगवास भोगल्याने जामिनावर सुटका करण्याचे आदेश दिले.

गवळीची बाजू अ‍ॅड. हडकर आणि अ‍ॅड. मीर नगमन अली यांनी मांडली.

२ मार्च २००७ रोजी घाटकोपरमधील असल्फा व्हिलेज भागातील

राहत्या घरी बसलेल्या नगरसेवक कमलाकर जामसंडेकर यांची

भरदिवसा गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती.

क्राईम ब्रांचने केलेल्या तपासानुसार राजकीय शत्रुत्वातून ही सुपारी देण्यात आली होती.

गवळीवर खून प्रकरणातील ३० लाखांची सुपारी स्वीकारल्याचा आरोप सिद्ध झाला.

या हत्येच्या प्रकरणात २७ जुलै २००८ रोजी गवळी व ११ जणांवर

महाराष्ट्र संघटित गुन्हे नियंत्रण कायदा (मकोका) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

त्यानंतर सत्र न्यायालयाने गवळीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती.

मात्र, १८ वर्षांनंतर सर्वोच्च न्यायालयाने गवळीला जामीन मंजूर करत सुटका करण्याचे आदेश दिले.

गवळीला या प्रकरणात २१ मे २००८ रोजी भायखळ्यातील

दगडी चाळीतून अटक करण्यात आली होती.

त्यावेळी ते भायखळा मतदारसंघातून आमदार होते .

जामसंडेकर यांनी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत गवळीच्या

अखिल भारतीय सेना पक्षाच्या उमेदवाराला अवघ्या ३६७ मतांनी पराभूत केले होते.

त्यानंतर काही महिन्यांतच त्यांची हत्या झाल्याने हा खटला चर्चेत राहिला होता.

Read also : https://ajinkyabharat.com/400-rarsh-bhaktiprampara-maradoh-gavat-vadyati-ganpati-bappanchi-visarganavina-mirvanuk/