चेलका गावात पत्रावळी मुक्त महाप्रसाद; पारंपरिक पद्धतीने नागरिकांचा उत्साह

पत्रावळी (प्लास्टिक) मुक्त उपक्रम

 बार्शीताकळी- तालुक्यातील चेलका गावात ऋषीपंचमी निमित्ताने सार्वजनिक

महाप्रसादाचे आयोजन ( दि.२८ ) पत्रावळी मुक्त पद्धतीने करण्यात आले.

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे मॉडेल व्हिलेज म्हणून ओळखल्या

जाणाऱ्या या गावातील मोर्णा शेतकरी गटाच्या सदस्य अरुण उंडाळ

यांच्या पुढाकाराने गावातील सदस्यांनी ठराव घेऊन

जेवणासाठी प्लास्टिकच्या पत्रावळी, द्रोण, ग्लास न वापरण्याचे ठरविले.

गावात शंभर स्टीलच्या ताट्यांची व्यवस्था केली असून,

महाप्रसादाचे जेवण यांमध्ये सर्व नागरिकांना स्टीलच्या ताट्यातून दिले गेले.

पारंपरिक पद्धतीने जेवणाचे आयोजन करून नागरिकांनी आपापले

ताट स्वतः स्वच्छ करण्याचा अनुभव घेतला, ज्यामुळे आनंदाचे वातावरण निर्माण झाले.

यापूर्वी सेवानगर येथे गोकुळाष्टमीच्या निमित्ताने महाप्रसादात उष्ट्या पत्रावळी,

द्रोण, ग्लास वापरल्याने गावातील चार गाईंचा मृत्यू झाला होता.

या कारणास्तव चेलका गावात पत्रावळी मुक्त उपक्रम राबविण्याचे ठरविण्यात आले.

या उपक्रमात गावातील जुंजाराम उंडाळ, महादेव अरबाड, तास्कंद इंगळे,

अरुण उंडाळ, सतिष उंडाळ, भिमराव कांबळे, समाधान इंगळे, मनोहर इंगळे,

हर्षद उंडाळ, सुनील उंडाळ तसेच मोर्णा शेतकरी गट,

जय गजानन शेतकरी गट आणि महालक्ष्मी महिला शेतकरी गट यांनी मोलाचे योगदान दिले.

Read also :  https://ajinkyabharat.com/sopinath-vidyalana-keli-kamal-19-years-gatat-vijay-miwat-jilhalastavar-entrance/