अकोला – कारंजा येथील क्रीडा संकुलावर नुकत्याच झालेल्या (दि.२५)
तालुकास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेत येवता (बंदी) येथील श्री सोपीनाथ महाराज उच्च माध्यमिक
विद्यालयाने उत्तुंग कामगिरी केली. १९ वर्षांखालील मुलींच्या गटात या विद्यालयाच्या खेळाडूंनी
चमकदार खेळ करत बाजी मारली.
त्याचबरोबर मुलांचा व मुलींचा संयुक्त संघ विजयी ठरून जिल्हास्तरावर स्थान पटकावले.
खेळाडूंच्या या यशामागे क्रीडा शिक्षक बी. एन. निंबाळकर
व प्रशिक्षक विनायक चव्हाण यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
तर स्पर्धेचे नियोजन क्रीडा संयोजक पराग गुल्हाने व त्यांच्या टीमने उत्कृष्टरीत्या केले.
खेळाडूंच्या यशाबद्दल गटशिक्षणाधिकारी माने साहेब तसेच
मुख्याध्यापक जे. बी. राठोड यांनी त्यांचे मनापासून अभिनंदन करत पुढील
स्पर्धांसाठी शुभेच्छा दिल्या. विद्यालय परिवार व ग्रामस्थांनीही खेळाडूंवर कौतुकाचा वर्षाव केला.
Read also: https://ajinkyabharat.com/rajya-vidyalan-granda-lakhacha-manacha-award-karyannahi-sanman/