महाराष्ट्र गवळी समाज संघटनेतर्फे आकिब शेकुवाले यांचा भव्य सत्कार

“समाजातील तरुणांसाठी आदर्श ठरले आकिब शेकुवाले”

कारंजा (लाड) :गवळी समाजातील होतकरू युवक आकिब मोहम्मद शेकुवाले

यांची सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये क्रेडिट ऑफिसर,

ग्रेड-I या पदावर झालेल्या निवडीबद्दल

महाराष्ट्र गवळी समाज संघटनेच्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला.

या प्रसंगी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आकिब यांचे अभिनंदन करून समाजाचा

अभिमान वाढवल्याबद्दल गौरव व्यक्त केला.

या सत्कारामुळे समाजातील इतर तरुणांना प्रेरणा मिळेल,

असा विश्वास मान्यवरांनी व्यक्त केला.

सत्कार कार्यक्रमास महाराष्ट्र गवळी समाज संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष रहेमान नंदावाले,

प्रदेश सहसचिव ॲड. सुभान खेतीवाले,

अमरावती विभागीय शिक्षण मंडळाचे माजी सदस्य प्रा. सी.पी. शेकुवाले,

माजी जिल्हाध्यक्ष हाजी कय्युम जट्टावाले, प्रहार शिक्षक व शिक्षकेतर संघटनेचे जिल्हाध्यक्ष युसुफ खेतीवाले,

जिल्हा कार्याध्यक्ष राहुल गुळदे, तसेच प्रवीण टाले,

डॉ. असद खान, माजी सभापती ॲड. फिरोज शेकुवाले,

चांद मुन्नीवाले यांच्यासह गवळी समाजातील अनेक पदाधिकारी, खेळाडू,

शिक्षकवर्ग व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

उपस्थित मान्यवरांनी सत्कारमूर्तींच्या कार्याची,

कर्तृत्वाची प्रशंसा करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुभान चौधरी यांनी केले तर

आभार प्रदर्शन शिक्षक युसुफ खेतीवाले यांनी मानले.

read also:https://ajinkyabharat.com/baniyal-jagatil-second-economy-ey-cha-ahwalatal-motha-claim/