Ulhasnagar Crime News:शॉकिंग! उल्हासनगरात गोळीबार आणि तलवारीचा हल्ला

गोळ्या, तलवारी आणि दहशत! उल्हासनगर हादरलं

 दोघे गंभीर जखमी, पोलिस पथके अलर्ट:उल्हासनगरच्या साईनाथ कॉलनीत

सोमवारी उशिरा रात्री धक्कादायक प्रकार घडला.

कौटुंबिक वादातून झालेल्या हल्ल्यात एका व्यक्तीवर गोळीबार

तर दुसऱ्यावर तलवारीने प्राणघातक वार करण्यात आला.

दोघे गंभीर जखमी असून त्यांच्यावर ठाण्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

प्राथमिक माहितीनुसार, आरोपी व पीडित कुटुंबात गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू होता.

सोमवारी तणाव चिघळताच शस्त्रांचा वापर करून थरारक हल्ला झाला.

पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला

व आरोपींच्या शोधासाठी विशेष पथके रवाना केली.

हिललाइन पोलिस ठाण्याचे अधिकारी सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत.

डीसीपी सचिन गोरे यांनी सांगितले की, “कौटुंबिक वादातून घटना घडली

असून आरोपींची ओळख पटली आहे.

त्यांना लवकरच अटक होईल.”

या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण

असून मोठा पोलिस बंदोबस्त तैनात आहे.

read also:https://ajinkyabharat.com/asia-cup-2025-half-sri-lankcha-zimbabwe-t20i-maliksathi-sangh-jaheer/