PM Kisan Yojana : तुमच्या खात्यात पैसे येणार की नाही?

21 व्या हप्त्या

PM Kisan Yojana : 21 व्या हप्त्यापूर्वी मोठी अपडेट, तुमच्या खात्यात पैसे येणार की नाही?

पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी (PM-Kisan) योजनेच्या 21 व्या हप्त्यापूर्वीच मोठी अपडेट समोर आली आहे.

यामुळे शेतकऱ्यांची उत्सुकता आणि धाकधूक दोन्ही वाढली आहेत.

केंद्र सरकारने योजनेत तांत्रिक अडचणींवर लक्ष केंद्रीत केले असून,

गावोगावी शिबिरे घेऊन त्या दूर करण्याचे आदेश दिले आहेत.

काय आहे अपडेट?

  • पीएम किसान योजनेचा 21 वा हप्ता नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये येण्याची शक्यता.

  • मागील हप्त्यावेळी झालेल्या तांत्रिक गडबडीवर यावेळी विशेष लक्ष.

  • आधार लिंकिंग, KYC, चुकीची बँक माहिती यामुळे अनेक शेतकऱ्यांना हप्ता मिळाला नव्हता.

  • यावेळी अशा चुका होऊ नयेत म्हणून बँका व राज्य सरकारला केंद्राची ताकीद.

गावागावात शिबिरे

सरकारने बँका आणि पंचायत स्तरावर विशेष शिबिरे आयोजित करण्याचे निर्देश दिले आहेत.

  • शेतकऱ्यांची KYC प्रक्रिया, बँक खात्याची माहिती, आधार पडताळणी यावर भर.

  • पात्र शेतकरी वंचित राहू नयेत यासाठी विशेष मोहीम.

  • शिबिरामुळे बोगस शेतकऱ्यांची माहितीही समोर येण्याची शक्यता.

पीएम किसान योजना थोडक्यात

  • सुरुवात : 24 फेब्रुवारी 2019

  • लाभार्थी : पात्र शेतकरी कुटुंब

  • आर्थिक मदत : वर्षाला 6000 रुपये, थेट खात्यात जमा

  • पद्धत : 2000 रुपयांचे 3 हप्ते, चार महिन्यांच्या अंतराने

  • आतापर्यंत : 20 हप्त्यांद्वारे 3.90 लाख कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा

सरकारच्या या पावलामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

मात्र, ज्यांची KYC व खाते माहिती अपडेट नाही, त्यांचा हप्ता पुन्हा अडकू शकतो.

त्यामुळे शेतकऱ्यांनी शिबिरात सहभागी होऊन आपली कागदपत्रे त्वरित दुरुस्त करणे आवश्यक आहे.

read also :https://ajinkyabharat.com/shivneriwarun-manoj-zarangren-moth-vidhan/