श्री संत गजानन महाराजांचा 115 वा पुण्यतिथी उत्सव; लाखो भाविकांच्या उपस्थितीत नगरपरिक्रमा आज दुपारी

115 व्या पुण्यतिथीला शेगाव नगरीत भक्तांचा महासागर

शेगाव  :श्री क्षेत्र शेगाव नगरीत संत गजानन महाराजांचा 115 वा पुण्यतिथी समाधी उत्सव

आज मोठ्या भक्तिभावाने सुरू आहे.

सकाळपासूनच दर्शनासाठी आलेल्या भाविकांच्या रांगा वाढत असून

दुपारपर्यंत लाखो भाविकांनी समाधीला नमन केले.

दरवर्षीप्रमाणेच आज दुपारी चार वाजता भव्य नगरपरिक्रमा निघणार आहे.

दीड ते अडीच तास चालणाऱ्या या परिक्रमेतील हजारो दिंड्या, टाळ-मृदंगाचा गजर,

भजन-कीर्तन आणि सजवलेले मंडप भाविकांचे मन वेधून घेणार आहेत.

भाविकांच्या सोयीसाठी मंदिर समिती व प्रशासनाकडून विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.

नि:शुल्क पाणी, प्रसाद, वैद्यकीय सुविधा व वाहतूक सेवेची सोय उपलब्ध आहे.

महाराष्ट्रासह इतर राज्यांतून आलेले लाखो भाविक या पुण्यतिथी सोहळ्याला उपस्थित राहून

गजानन महाराज की जय” च्या गजराने शेगाव नगरी दुमदुमली आहे.

read also:https://ajinkyabharat.com/ganeshotsavachi-enthusiast/