बार्शीटाकळी – अकोला जिल्ह्यातील अवैध धंद्याविरुद्ध सुरू असलेल्या ऑपरेशन प्रहार
मोहिमेअंतर्गत आज बार्शीटाकळी पोलीस स्टेशन हद्दीत महत्त्वाची कारवाई करण्यात आली.
पोलीसांनी इंदिरा आवास बार्शीटाकळी येथे छापा मारून 50 वर्षीय रईस खान रफिक खान
याच्याकडून दोन धारदार तलवारी जप्त केल्या आहेत.
आरोपीला ताब्यात घेऊन पुढील कारवाई सुरू करण्यात आली आहे.
सदर कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री अर्चीत चांडक,
मा. अपर पोलीस अधीक्षक बी. चंद्रकांत रेड्डी आणि
उप विभागीय पोलीस अधिकारी वैशाली मुळे यांच्या मार्गदर्शनाखाली,
तसेच पोलीस निरीक्षक प्रवीण धुमाळ व पोलीस स्टेशन
बार्शीटाकळीच्या अधिकारी व अंमलदारांच्या सहभागाने करण्यात आली.