शेतकरी राजाच्या सन्मानार्थ भव्य बैलगाड्यांची मिरवणूक

शेतकरी

 कारंजा (लाड): विघ्नहर्ता गणेशोत्सव मंडळाच्या वतीने गणरायाचा आगमन सोहळा

शेतकरी निवास येथून देशमुख मंगलम येथे मोठ्या उत्साहात पार पडला.

या सोहळ्याचे मुख्य आकर्षण म्हणजे जगाचा पोशिंदा

शेतकरी राजाच्या सन्मानार्थ काढण्यात आलेली भव्य बैलगाड्यांची मिरवणूक व दिंडी.

या मिरवणुकीत सजवलेल्या बैलगाड्या आणि पारंपरिक वेशभूषेतले शेतकरी यांच्या

उपस्थितीमुळे आगमन सोहळ्याला वेगळेच रंगत लाभली.

शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने गर्दी करून हा आनंददायी देखावा पाहिला.

ढोल-ताशांच्या गजरात, उत्साहपूर्ण जयघोषात गणरायाचे स्वागत करण्यात आले.

विशेष लक्षवेधी

सजवलेल्या बैलगाड्यांवर गणरायाचे स्वागत युवकांकडून पारंपारिक पद्धतीने करण्यात आले.

आजच्या मोबाईल युगातही युवकांनी आधुनिक साधनांपेक्षा पारंपरिक पद्धतीला प्राधान्य दिले,

शेतकरी आणि बैलगाडी यांच्या सन्मानार्थ भव्य मिरवणूक काढली.

त्यामुळे युवकांचे कौतुक होत आहे आणि हा सोहळा अधिक लक्षवेधी बनला आहे.

read also:https://ajinkyabharat.com/gemini-casual-expenses/