4 जहाल नक्षलवाद्यांचा खात्मा, 3 महिलांचा समावेश; शस्त्रसाठा जप्त
गडचिरोली – गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यात पोलिसांनी मोठी कारवाई
करत चार जहाल नक्षलवाद्यांचा खात्मा केला आहे.
मृतांमध्ये एक पुरुष व तीन महिला नक्षलवाद्यांचा समावेश असून,
घटनास्थळावरून मोठा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे.
कोपर्शी जंगलात भीषण चकमक :
गडचिरोली–नारायणपूर सीमेवरील कोपर्शी जंगलात गडचिरोली विभागाचे
गट्टा दलम व कंपनी क्रमांक 10 चे नक्षलवादी दबा धरून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.
त्यानंतर अपर पोलीस अधीक्षक (अभियान) एम. रमेश यांच्या नेतृत्वाखाली
C-60 च्या 19 पथका आणि CRPF QAT च्या 2 पथका जंगल परिसरात रवाना झाल्या.
या भागात प्रचंड पावसामुळे पोलीस पथकांना दोन दिवस थांबावे लागले.
अखेर आज सकाळी पथके जंगलात पोहोचली आणि शोधमोहीम सुरू झाली.
यावेळी नक्षलवाद्यांनी पोलिसांवर अंधाधुंद गोळीबार केला.
पोलिसांनीही प्रभावी प्रत्युत्तर देत जवळपास 8 तास चकमक केली.
चार नक्षलवाद्यांचा खात्मा :
शोधमोहीमेदरम्यान पोलिसांना चार जहाल नक्षलवाद्यांचे मृतदेह आढळले.
त्यात 1 पुरुष व 3 महिला आहेत.
घटनास्थळावरून 1 SLR रायफल, 2 INSAS रायफल व 1 .303 रायफल जप्त करण्यात आली आहे.
अभियान अजूनही सुरू :
संपूर्ण परिसरात अजूनही सर्च ऑपरेशन सुरू आहे.
पोलिसांच्या या कारवाईनंतर गडचिरोली जिल्ह्यातील माओवादी संघटनांना मोठा धक्का बसला आहे.
Read also : https://ajinkyabharat.com/jp-vidyalaya-kamargaon-yehe-shadu-ganpati-murthy-keda/