विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग, ममता म्हातारमारे ठरली अव्वल
शेलुबाजार वार्ता –आदर्श ग्राम वनोजा येथील श्रीमती साळुंकाबाई राऊत कला आणि वाणिज्य महाविद्यालयात
‘इंग्रजी साहित्य आणि आजचा तरुण वर्ग’ या विषयावर एकदिवसीय
परिसंवाद उत्साहात पार पडला.
इंग्रजी विभागाने आयोजित केलेल्या या
परिसंवादात विद्यार्थी–प्राध्यापकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला.
या परिसंवादाचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे प्राचार्य
डॉ. डी. आर. गावंडे यांनी भूषवले. प्रमुख पाहुणे म्हणून
डॉ. जी. बी. घोंगटे, प्रा. दिलीप मुंदे, डॉ. एस. एस. कडू,
प्रा. बी. एस. डोंगरे, डॉ. जय कवारे, प्रा. रवी कुटे
आणि प्रा. अक्षय अव्हाळे उपस्थित होते.
प्रा. दिलीप मुंदे यांनी साहित्याची समकालीन समाजातील बदलती भूमिका अधोरेखित करताना,
“इंग्रजी साहित्याने तरुणांमध्ये चिकित्सक विचार,
सांस्कृतिक जागरूकता आणि भावनिक बुद्धिमत्ता वाढवली आहे,” असे सांगितले.
तर समारोपपर भाषणात डॉ. घोंगटे यांनी अशा शैक्षणिक उपक्रमांचे महत्त्व पटवून दिले.
यावेळी विद्यार्थ्यांनी शोधनिबंध सादर केले.
या सादरीकरणांचे मूल्यांकन प्रा. डी. आर. मुंदे व डॉ. एम. व्ही. पाथ्रीकर यांनी केले.
विजेत्यांमध्ये प्रथम क्रमांक ममता म्हातारमारे,
द्वितीय प्रिती टोंचर आणि तृतीय शिवानी पाटील यांनी बाजी मारली.
हा परिसंवाद इंग्रजी विभागप्रमुख प्रा. डी. डी. भगत यांच्या
मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. राधिका सावके यांनी केले,
तर आभारप्रदर्शन विद्यार्थिनी सपना चव्हाण हिने केले.
read also: https://ajinkyabharat.com/hand-held-machine/