भडशिवणी उपकेंद्रात 63 संशयितांची तपासणी, 14 चे स्पुटम नमुने गोळा
शेलूबाजार वार्ता –प्राथमिक आरोग्य केंद्र धामणी अंतर्गत आरोग्य उपकेंद्र भडशिवणी येथे
आज हॅन्ड हेल्ड मशीनच्या सहाय्याने क्षयरुग्ण शोध मोहीम राबविण्यात आली.
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. पांडुरंग ठोंबरे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अनिल कावरखे,
जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. सतीश परभणकर, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. रामहरी बेले,
तालुका आरोग्य अधिकारी डॉ. शंकर नांदे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम पार पडली.
वैद्यकीय अधिकारी डॉ. गजानन वैद्य, डॉ. प्रशांत महाकाळ, डॉ. प्रवीण गावंडे यांनी सक्रिय सहभाग नोंदवला.
आरोग्य सहाय्यक रामकृष्ण राठोड, नासिर खान, आरोग्य सेवक केशव उपाध्ये, प्रशांत काटोले,
आरोग्य सेविका भाग्यश्री कडू, परिचर मनिष जाधव,
वाहनचालक गणेश राऊत तसेच आशा कार्यकर्त्यांच्या सहकार्याने शिबिर यशस्वी झाले.
क्ष किरण वैज्ञानिक अधिकारी वैभव रोडे व मानसिंग इंगळे यांनी
एकूण 63 संशयितांची एक्स-रे तपासणी केली.
यापैकी 14 जणांचे स्पुटम नमुने गोळा करण्यात आले.
शिबिराचे नियोजन जिल्हा क्षयरोग केंद्राचे आरोग्य निरीक्षक रामदास गवई यांनी केले.
यावेळी उपस्थितांना क्षयरोग,
डेंगू आणि इतर संसर्गजन्य रोगांबाबत आरोग्य शिक्षणही देण्यात आले.
read also: https://ajinkyabharat.com/vijay-pajai-yanchi-sriharikotta-space-center-practice/