राज्यात गणेशोत्सवाच्या उत्साहाची लागण आता सेलिब्रिटींच्या घरांनाही झाली आहे.
ढोल-ताशांच्या गजरात आणि जल्लोषात आज (२७ ऑगस्ट)
गणपती बाप्पाचे घरोघरी स्वागत करण्यात आले.
यामध्ये मराठी कलाकारांच्या घरचा बाप्पा चाहत्यांच्या विशेष आकर्षणाचा विषय ठरत आहे.
अभिनेत्री रुपाली भोसले – दरवर्षीप्रमाणे यंदाही तिने बाप्पाचे स्वागत धुमधडाक्यात केले
असून सुंदर सजावटीमुळे तिच्या घरचा बाप्पा विशेष आकर्षक ठरत आहे.
अभिनेता स्वप्नील जोशी – स्वप्नीलच्या घरीदेखील बाप्पाचे आगमन झाले आहे.
कुटुंबासह तो उत्सव साजरा करताना दिसत आहे.
अभिनेत्री अभिज्ञा भावे – पारंपारिक उत्साह कायम ठेवत अभिज्ञाने यंदाही
बाप्पाचे स्वागत भव्य डेकोरेशनसह केले आहे.
अभिनेत्री सायली संजीव – लाडक्या बाप्पासाठी तिने केलेली साधी पण देखणी
सजावट चाहत्यांच्या मनाला भावणारी आहे.
अभिनेता सुबोध भावे – यंदा सुबोधच्या घरचा खास आकर्षण ठरलं आहे त्याच्या मुलाने केलेलं डेकोरेशन.
त्याच्या कल्पक सजावटीने गणपती बाप्पाचे आगमन अधिकच खास झालं आहे.
गणेशोत्सवाच्या या आनंदमयी वातावरणात मराठी सेलिब्रिटींचा उत्साह
सोशल मीडियावर चाहत्यांशी शेअर होत असून सर्वत्र “गणपती बाप्पा मोरया!” चा गजर घुमत आहे.
read also:https://ajinkyabharat.com/ganpati-bappa-morya-jayagoshat-arrives/