रोहित-विराट चर्चेत, पण अश्विनचा मोठा निर्णय! IPL मधून निवृत्ती
सध्या रोहित शर्मा आणि विराट कोहली वनडे क्रिकेटमधून कधी निवृत्त होणार,
यावर सर्वत्र चर्चा सुरू आहे.
पण या गदारोळात भारताचा आणखी एक दिग्गज खेळाडू मैदानाबाहेर गेला आहे.
टीम इंडियाचा अनुभवी फिरकीपटू रविचंद्रन अश्विनने IPL मधून निवृत्ती जाहीर केली असून,
चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.
अश्विनने सोशल मीडियावर लिहिलं – “प्रत्येक शेवट म्हणजे नवीन सुरुवात.
माझ्यासाठी आता आयपीएलचा शेवट आणि नवा प्रवास सुरू होत आहे.”
त्याने BCCI आणि खेळवलेल्या सर्व फ्रेंचायझींप्रती आभारही मानले.
निवृत्तीमागचं कारण काय?
अश्विनने संकेत दिला आहे की, त्याची नजर आता परदेशी T20 लीग्सकडे आहे.
तिथे खेळण्यासाठी IPL मधून निवृत्ती घेणं त्याच्यासाठी आवश्यक होतं.
16 वर्षांचा IPL प्रवास
पदार्पण : 2009, CSK
संघ : CSK, रायजिंग पुणे सुपरजायंट्स, दिल्ली कॅपिटल्स, पंजाब किंग्स, राजस्थान रॉयल्स
सामने : 221
विकेट्स : 187
धावा : 833 (1 अर्धशतक)
अश्विनने आपला प्रवास जिथे सुरू केला तिथेच, चेन्नई सुपर किंग्जसह IPL 2025 मध्ये तो संपवला.
रोहित-कोहलीच्या निवृत्तीवर चर्चा रंगत असताना,
अश्विनच्या अचानक घेतलेल्या निर्णयाने एक मोठं पर्व संपलं आहे.
आता क्रिकेटप्रेमींच्या नजरा त्याच्या नव्या इनिंगकडे लागल्या आहेत.