मुस्लिम तरुणाने दिला किडनी दानाचा प्रस्ताव; प्रेमानंद महाराजांचा मोठा खुलासा

हिंदू संत आणि मुस्लिम तरुणाच्या भावनेने दिला ऐक्याचा संदेश

वृंदावनचे संत प्रेमानंद महाराज अनेक वर्षांपासून मूत्रपिंडाच्या आजाराने

त्रस्त असून त्यांना नियमितपणे डायलिसिस करावे लागते.

अशा स्थितीत मध्यप्रदेशातील इटारसी येथील आरिफ चिश्ती या मुस्लिम तरुणाने

त्यांना एक किडनी दान करण्याची तयारी दाखवली.

आरिफ हा महाराजांचे प्रवचन व सत्संग नियमितपणे ऐकतो.

त्यांच्या विचारांनी प्रभावित होऊन त्याने नकारात्मकतेपासून मुक्त जीवन स्वीकारले.

संतांची तब्येत नाजूक असल्याचे समजताच त्याने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत महाराजांना पत्र लिहून किडनी दान करण्याची इच्छा व्यक्त केली.

मात्र, महाराजांनी आरिफची भावना मान्य केली असली तरी विनम्रतेने किडनी स्वीकारण्यास नकार दिला.

त्यांनी आरिफचे आभार मानले आणि त्याच्या भावनेचे कौतुक केले.

महाराज म्हणाले, “आरिफने दिलेला हा संदेश हा देशातील हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक आहे.

समाजात बंधुता आणि एकतेचा प्रकाश पसरवणारा हा मोठा आदर्श आहे.”

विशेष म्हणजे, प्रेमानंद महाराजांनी आरिफला वृंदावनला येण्याचे आमंत्रणही दिले.

read also :https://ajinkyabharat.com/jarange-patallancha-first-mukkam-junnar-jilahadhiyancha-order-shetmalacha-market-closed/