मराठा आरक्षणासाठी सुरू असलेला मनोज जरांगे पाटील यांचा लढा आता मुंबईकडे सरकत आहे.
त्यांच्या या प्रवासातील पहिला मुक्काम जुन्नर शहरात असणार आहे.
या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मराठा बांधवांची गर्दी अपेक्षित असल्याने कायदा
व सुव्यवस्था अबाधित राहावी म्हणून प्रशासनाने विशेष पावले उचलली आहेत.
पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी
जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचा २८ ऑगस्ट रोजी होणारा
शेतमालाचा लिलाव बंद ठेवण्याचे आदेश जारी केले आहेत.
जरांगे पाटील जुन्नरमध्ये मुक्काम करताना किल्ले शिवनेरीवर नतमस्तक होऊन पुढील प्रवासाला सुरुवात करतील.
यावेळी हजारोंच्या संख्येने मराठा बांधव शहरात दाखल होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
गर्दीच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था बिघडू नये म्हणून बाजार समिती बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.
मराठा आरक्षणाच्या या लढ्याला महाराष्ट्रभरातून मोठा प्रतिसाद मिळत असून,
जुन्नर येथील पहिला मुक्काम ऐतिहासिक ठरण्याची शक्यता आहे.
Read also : https://ajinkyabharat.com/shirla-grampanchayatichaya-rare-rakshamue-citizen/