अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या भारतावरील भाषेत मोठा बदल पाहायला मिळत आहे.
काही दिवसांपूर्वी भारताला सतत धमक्या देणारे
ट्रम्प आता पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कौतुक करताना दिसत आहेत.
अमेरिकेने भारतावर तब्बल 50 टक्के टॅरिफ लावल्याने दोन्ही देशांतील संबंध ताणले.
ट्रम्प यांनी भारत रशियाकडून तेल खरेदी करत असल्याने हा निर्णय घेतल्याचे सांगितले.
मात्र, चीन व रशियावर असा टॅरिफ लावण्यात आलेला नाही.
भारताने अमेरिकेच्या अटी मान्य करण्यास स्पष्ट नकार दिल्याने संघर्ष अधिकच वाढला.
दरम्यान, भारत, रशिया आणि चीन यांच्यातील महत्त्वपूर्ण बैठक होणार
असून या बैठकीत अमेरिकेविरोधात मोठे निर्णय होण्याची शक्यता आहे.
तीन बलाढ्य राष्ट्रे एकत्र येत असल्याने अमेरिकेत चांगलाच खळबळजनक माहोल निर्माण झाला आहे.
याच पार्श्वभूमीवर ट्रम्प यांनी आता आपली भूमिका बदलली.
मोदी हे “अद्भुत व्यक्ती” असल्याचे सांगत त्यांनी त्यांचे वैयक्तिक कौतुक केले.
इतकेच नव्हे तर ट्रम्प यांनी तब्बल चार वेळा पंतप्रधान मोदींना फोन केल्याची माहिती समोर आली आहे.
मात्र, मोदी यांनी त्या कॉलकडे दुर्लक्ष केल्याने संवाद होऊ शकला नाही.
ट्रम्प यांची भाषा अचानक बदलल्याने जागतिक राजकारणात नवा पेच निर्माण झाला आहे.
Read also :https://ajinkyabharat.com/mumbaichaya-dishne-manoj-jarang-thousands-of-gadyancha-tafa-sobat/