आकिब शेकुवाले सेंट्रल बँकेत अधिकारीपदी नियुक्त

सेंट्रल

कारंजा (लाड) – गवळीपुरा येथील आकिब मोहम्मद शेकुवाले यांनी उल्लेखनीय

यश मिळवत सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये क्रेडिट ऑफिसर (ग्रेड-I) पदावर निवड मिळवली आहे.

या यशामुळे कारंजा शहरासह परिसरात आनंदाचे वातावरण पसरले आहे.

राष्ट्रीय स्तरावरील IBPS संस्थेतर्फे झालेल्या परीक्षेत तब्बल चार लाख

उमेदवारांमधून केवळ एक हजारांची निवड झाली असून, त्यामध्ये आकिब शेकुवाले यांचा समावेश आहे.

कृषी शाखेत पदवी (B.Sc. Agriculture) व एम.ए. (अर्थशास्त्र) पर्यंत शिक्षण घेतलेल्या आकिब यांनी मेहनत,

चिकाटी व आत्मविश्वासाच्या जोरावर हे यश संपादन केले.

त्यांच्या यशामागे आई–वडिलांचे मार्गदर्शन व कुटुंबाचा मोठा वाटा असल्याचे मानले जाते.

या कामगिरीमुळे शेकुवाले परिवारासह संपूर्ण कारंजा शहरात अभिमानाची लाट उसळली असून,

नागरिक व मान्यवरांनी आकिब यांचे अभिनंदन केले आहे. त्यांचे यश इतरांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

Read also : https://ajinkyabharat.com/akot-nagar-parishdechya-karvadhivat-high-court-public-interest-litigation/