खासगी कोचिंग क्लासेसचा ग्रामीण शिक्षणावर दुष्परिणाम

शाळा फक्त उपस्थिती भरतात, मुलं कोचिंगमध्ये शिकतात

खासगी कोचिंग क्लासेसचा ग्रामीण शिक्षणावर दुष्परिणाम

भारतात खासगी कोचिंग क्लासेसचा वाढता प्रभाव आता शालेय शिक्षणावर छाया टाकत असल्याचे चित्र दिसत आहे.

शहरांमध्ये लाखो विद्यार्थी दरवर्षी महागड्या कोचिंग क्लासेसमध्ये प्रवेश घेत असताना, ग्रामीण भागातील विद्यार्थी मात्र मागे पडत आहेत.

अभ्यासकांच्या मते, खासगी क्लासेसमुळे सरकारी शाळांचा शैक्षणिक दर्जा घसरत चालला आहे.

पालक आणि विद्यार्थी शाळेतील अध्यापनाकडे दुर्लक्ष करून क्लासेसवर जास्त अवलंबून राहू लागले आहेत.

परिणामी शाळेतील शिक्षकांची भूमिका दुय्यम ठरत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

शहरांमध्ये कोचिंग क्लासेस सहज उपलब्ध असतात, मात्र ग्रामीण भागात अशी सुविधा फारशी नाही.

त्यामुळे ग्रामीण विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक परीक्षांमध्ये न्याय्य संधी मिळत नाही.

महागड्या फी परवडत नसल्यामुळे गरीब कुटुंबातील मुलांचे शिक्षण अर्धवट राहते,

तर काही पालक कर्ज काढून मुलांना क्लासेसला पाठवत असल्याचेही समोर येत आहे.

विद्यार्थ्यांचे शहरांकडे मोठ्या प्रमाणावर स्थलांतर होत असून, कोटा, पुणे,

हैदराबादसारख्या शिक्षणकेंद्रांमध्ये मानसिक तणाव आणि आत्महत्यांच्या घटनाही घडत

असल्याचे धक्कादायक वास्तव तज्ज्ञांनी नमूद केले.

सरकारी शाळांचा दर्जा वाढवण्यासाठी आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना

समसमान संधी देण्यासाठी सरकारने दर्जेदार शिक्षक,

आधुनिक साधने आणि स्पर्धा परीक्षांसाठी स्वतंत्र मार्गदर्शन केंद्र उभारणे गरजेचे असल्याचे शिक्षणतज्ज्ञांचे मत आहे.

Read also : https://ajinkyabharat.com/bomb-inaccessible-karoon-poles/