भारतावर ‘टॅरिफ मिसाईल’चा संकट
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा धमकीची
भाषा वापरत जागतिक स्तरावर खळबळ माजवली आहे.
रशियाकडून तेल खरेदी थांबवावी म्हणून अमेरिकेकडून भारतीय वस्तूंवर तब्बल ५० टक्के
टॅरिफ लावण्याची घोषणा त्यांनी काही दिवसांपूर्वी केली होती.
आता त्याच घोषणेनुसार २५ टक्के टॅरिफ लावण्याची अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे.
दरम्यान, भारतासह अनेक देशांवर टॅरिफ लादल्यानंतर ट्रम्प यांनी पुन्हा एकदा मोठी धमकी दिली आहे.
जो देश अमेरिकेतील टेक कंपन्यांवर डिजिटल सेवा कर (डिजिटल सर्व्हिस टॅक्स) लावेल,
त्या देशाविरोधात कठोर टॅरिफ लागू केला जाईल, असा इशारा त्यांनी दिला आहे.
अमेरिकन कंपन्यांवर अन्याय?
ट्रम्प यांनी आपल्या ट्रुथ सोशल या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लिहिताना दावा केला की,
डिजिटल टॅक्स आणि डिजिटल मार्केट रेग्युलेशनच्या माध्यमातून अमेरिकन कंपन्यांना नुकसान पोहोचवले जात आहे.
चीनच्या मोठ्या टेक कंपन्यांना सूट दिली जाते, मात्र अल्फाबेट, मेटा, अमेझॉनसारख्या अमेरिकन कंपन्यांवर अन्याय केला जातोय.
हे नियम अमेरिकन कंपन्यांविरोधात भेदभाव करण्यासाठीच बनवले गेले आहेत.
“हे सगळं लवकर बंद करा, अन्यथा…”
ट्रम्प यांनी इशारा दिला आहे की, जर हा भेदभाव तात्काळ थांबवला गेला नाही,
तर अमेरिका आपली मौल्यवान तंत्रज्ञान उत्पादने आणि चिप्सच्या निर्यातीवर बंदी घालेल.
यामुळे भारतासारख्या देशांसमोर आधीच निर्माण झालेल्या अडचणींमध्ये आणखी भर पडण्याची शक्यता आहे.
पुढे ट्रम्प यांची ही आक्रमक भूमिका जागतिक व्यापार आणि भारत-अमेरिका संबंधांवर काय परिणाम घडवते,
हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
Read also :https://ajinkyabharat.com/shraddhaunchaya-secure-vaishnodevi-yatra-adjourned/