कर्नाटकमध्ये “कोंबडीन ” दिलं नीळं अंडं; अधिकारीही चकित, काय सांगतोय विज्ञान?

कर्नाटकमध्ये

दावणगेरे (कर्नाटक) : कर्नाटकातील दावणगेरे जिल्ह्यातील चन्नगिरी तालुक्यातील नल्लूर गावात

एक अनोखा प्रकार घडला आहे. गावातील सैयद नूर यांच्या कुक्कुटपालन शेतावर एका कोंबडीनं अचानक नीळं अंडं दिलं.

साधारणपणे पांढरी अंडी देणाऱ्या या मुर्गीचं नीळं अंडं पाहून शेतकरी आणि गावकरी दोघेही थक्क झाले.

ही बाब समजताच पशुपालन विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले.

त्यांनीही या घटनेबद्दल आश्चर्य व्यक्त केलं.

प्राथमिक अंदाजानुसार अंड्याच्या कवचावर दिसणारा

नीळा रंग ‘बिलीव्हरडिन’ नावाच्या पिगमेंटमुळे असल्याचं सांगण्यात आलं.

अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं की, जर ही कोंबडी  पुढेही सतत नीळी अंडी देत राहिली,

तर त्याचा सखोल वैज्ञानिक अभ्यास केला जाणार आहे.

नीळ्या अंड्यांच्या खास कोंबड्या

सामान्यतः बाजारात पांढरी किंवा तांबूस रंगाची अंडी सहज मिळतात.

पण जगभरात काही विशिष्ट जातीच्या कोंबड्या नीळ्या अंड्यांसाठी ओळखल्या जातात.

या जातींमध्ये अरौकाना (Araucana) आणि अमेरिकाना (Americana) या प्रजाती प्रमुख आहेत.

या मुर्ग्या हलक्या निळ्या ते गडद निळ्या रंगापर्यंत विविध छटांची अंडी देतात.

पौष्टिकतेत फरक नाही

नीळ्या रंगामुळे अंडं वेगळं वाटलं तरी पौष्टिकतेत काही फरक नसतो.

ही अंडीही प्रथिने व ओमेगा-३ ने भरलेली असतात.

मात्र, अशा  कोंबड्या दुर्मीळ असल्याने त्यांची अंडी साध्या अंड्यांपेक्षा महाग असतात.

सध्या नल्लूर गावातील या कोंबडीने  दिलेलं नीळं अंडं ग्रामस्थांसह अधिकाऱ्यांसाठी मोठं कुतूहल ठरत आहे.

Read also  :  https://ajinkyabharat.com/nikki-bhati-episode-new-twist/