निक्की भाटी प्रकरणात नवा ट्विस्ट !

निक्की भाटी प्रकरणात धक्कादायक ट्विस्ट

 गॅस सिलेंडरचा स्फोट की हत्या?

फोर्टिस हॉस्पिटल मेमोमध्ये सिलेंडर ब्लास्टचा उल्लेख, पोलिसांचा तपास वेगात

ग्रेटर नोएडा : निक्की भाटी प्रकरणात दररोज नवे खुलासे होत असून आता या प्रकरणाने नवा मोड घेतला आहे.

सुरुवातीला हुंडाबळीची घटना असल्याचा संशय व्यक्त होत असताना,

आता गॅस सिलेंडरच्या स्फोटामुळे आग लागल्याचा दावा करण्यात येत आहे.

काय आहे नवीन दावा?

विपिन भाटीचा चुलतभाऊ यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की,

आग लागल्याच्या तात्काळ नंतर निक्कीला सासरकऱ्यांनी फोर्टिस हॉस्पिटलमध्ये नेले होते.

तेव्हा डॉक्टरांना सांगण्यात आले की, आग ही गॅस सिलेंडर फुटल्यामुळे लागली.

  • फोर्टिस हॉस्पिटलने पोलिसांना पाठवलेल्या मेमोमध्ये देखील “सिलेंडर ब्लास्टमुळे आग लागली” असा उल्लेख आहे.

  • कासना पोलिसांना या मेमोवरूनच घटनेची पहिली माहिती मिळाली होती.

  • पोलिस आता हॉस्पिटलमधील डॉक्टरांचे निवेदन नोंदवणार असून, त्या दिवशीचे सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासले जाणार आहेत.

आरोप की माहिती लपवली गेली?

दावा असा देखील करण्यात आला आहे की, निक्कीच्या कुटुंबीयांनी तिला हॉस्पिटलमध्ये भरती

करताना हत्या किंवा हत्या करण्याच्या प्रयत्नाचा मुद्दा लपवला होता.

सीसीटीव्ही फुटेज काय सांगतात?

टाइम्स ऑफ इंडियाच्या अहवालानुसार, घटनेच्या वेळेस निक्कीचा पती विपिन भाटी

आणि त्यांचा मुलगा घराबाहेर असल्याचे सीसीटीव्हीमध्ये दिसत आहे.

फुटेजनुसार, विपिन आपल्या घराबाहेरील एका किराणा दुकानात खरेदी करताना आढळून आला आहे.

Read also : https://ajinkyabharat.com/kamargaon-in-the-meantime-there-is-a-fierce-impact/