बॉलिवूडची सुपरस्टार शिल्पा शेट्टी दरवर्षी मोठ्या दणक्यात घरात गणेशोत्सव साजरा करतात.
२००२ पासून शिल्पा आणि त्यांच्या कुटुंबीयांनी २२ वर्षांपासून हा उत्सव मनोभावे साजरा केला आहे.
मात्र यंदा शिल्पा शेट्टींच्या घरात ही परंपरा थांबणार आहे.
शिल्पा शेट्टींनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत याबाबत माहिती दिली आहे.
त्यांनी म्हटले आहे, “मित्रांनो, अत्यंत दुःखाने कळवित आहोत की कुटुंबातील सदस्याच्या निधनामुळे
यंदा आम्ही दरवर्षीप्रमाणे गणेशोत्सव साजरा करणार नाही.
परंपरेनुसार आम्ही १३ दिवसांचं सुतक पाळत आहोत आणि त्यामुळे कोणतेही धार्मिक उत्सव घरात होणार नाहीत.”
मिडिया रिपोर्टनुसार, शिल्पा शेट्टींच्या कुटुंबात कुणाचंही निधन झालेलं नाही,
मात्र त्यांच्या पती राज कुंद्रा यांच्या कुटुंबातील एखाद्या जवळच्या व्यक्तीचं निधन झाल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.
शिल्पा शेट्टींनी पोस्टच्या शेवटी “कुंद्रा कुटुंबीय” असे लिहिले आहे, ज्यावरून अंदाज व्यक्त केला जात आहे की,
मृत्यू कुंद्रा कुटुंबातील सदस्याशी संबंधित आहे.
दरम्यान, इतर अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी जसे की विवेक ओबेरॉय, गोविंदा, श्रद्धा कपूर, सोनू सूद,
ईशा कोपीकर आणि सलमान खान यांनी गणेशोत्सव उत्साहात साजरा केला आहे.
गणेशोत्सवाच्या वेळी या सेलिब्रिटींचे उत्साही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतात.
Read also :https://ajinkyabharat.com/aries-aajcha-day-tumchayasathi-for-changla-raheel/