मुर्तीजापूरात ढगफुटी पावसाचा कहर; शेतकऱ्याची आत्महत्या

शेतकऱ्याची आत्महत्या

अकोला जिल्ह्यातील मुर्तीजापूर तालुक्यात ढगफुटी पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असून या नैसर्गिक आपत्तीमुळे हताश झालेल्या शेतकऱ्याने

गळफास घेऊन आत्महत्या केली. खरब ढोरे येथील शेतकरी राजेंद्र ज्ञानेश्वरराव ढोरे (वय ५१) यांनी जीवनयात्रा संपवली.

रविवारी झालेल्या ढगफुटी पावसामुळे नदी-नाले तुडुंब भरून वाहिले. शेतकरी राजेंद्र ढोरे यांच्या सात एकर शेतीतील पिके

पाण्याच्या प्रचंड लोंढ्याने खरडून गेली. झालेल्या संपूर्ण नुकसानामुळे नैराश्यग्रस्त होऊन त्यांनी आत्महत्या केली.

या घटनेनंतर गावभर हळहळ व्यक्त होत आहे. मृत शेतकरी कुटुंबाचा आधारवड असल्याने त्यांच्या पश्चात संसारिक संकट अधिकच वाढले आहे.

दरम्यान, मुर्तीजापूर तालुक्यात शेतकरी आत्महत्यांची मालिका सातत्याने सुरूच आहे. शासनाने सातबारा कोरा करण्याचे आश्वासन दिले असले तरी त्याची

अंमलबजावणी अद्याप झालेली नाही. त्यातच कर्जबाजारीपणा आणि वारंवार येणाऱ्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांच्या

उपजीविकेचा प्रश्न गंभीर स्वरूप धारण करत आहे.

Read also :https://ajinkyabharat.com/ghazha-pattya-israelcha-massachar-hospital-drone-halla-3-journalists/