कुरणखेडचा भूमिपुत्र अंकुश राजेश चव्हाण झाला ‘सीएस’

“कुरणखेडचा अभिमान : अंकुश चव्हाण बनला सीएस”

कुरणखेड – कुरणखेडच्या मातीतून अत्यंत हलाकीच्या आर्थिक परिस्थितीतून शिक्षण घेऊन गावाचं आणि समाजाचं नाव उज्ज्वल करणारा अंकुश राजेश

चव्हाण याने कंपनी सेक्रेटरी (CS) ही प्रतिष्ठेची परीक्षा उत्तीर्ण केली आहे.

अंकुशने प्राथमिक शिक्षण कुरणखेड येथील जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळेत घेतले.

पुढील शिक्षणासाठी तो चंद्रपूर येथे स्थायिक झाला आणि गेल्या अनेक वर्षांपासून सीएस परीक्षेची मनापासून तयारी करत होता.

अखेर त्याच्या अथक परिश्रमांना यश आलं असून नुकत्याच जाहीर झालेल्या निकालात तो उत्तीर्ण झाला आहे.

इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया (ICSI) च्या निकालात चंद्रपूर जिल्ह्यातून एकमेव विद्यार्थी म्हणून अंकुश राजेश चव्हाणने

यश संपादन केले आहे. त्यामुळे कुरणखेड गावाचा अभिमान आणखी वाढला आहे.

आपल्या यशाचे श्रेय अंकुशने आई-वडील व आजी यांना दिलं असून त्याच्या मित्रपरिवार व नातेवाईकांकडून त्याला

पुढील वाटचालीसाठी शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Read also :  http://ajinkyabharat.com/rotary-club-of-akot-tarfe-grand-eye-tapasani-and-mofat-chushme-vatap-shibir/