भारत-चीन संबंध पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. भारताने अमेरिकेवर टॅरिफ लावल्यानंतर भारत-चीनची जवळीक वाढल्याचे दिसत आहे. मात्र, चीनसोबतची
मैत्री धोकादायक ठरू शकते, याचा पुरावा पुन्हा एकदा समोर आला आहे.
माहितीनुसार, तिबेटमध्ये चीन जगातील सर्वात मोठे धरण उभारण्याच्या तयारीत आहे, ज्यामुळे भारताला मोठा फटका बसू शकतो. या धरणामुळे नदीचा
प्रवाह तब्बल ८५ टक्क्यांपर्यंत कमी होऊ शकतो, अशी भीती भारताने व्यक्त केली आहे. नदीच्या प्रवाहावर परिणाम झाला, तर भारतातील शेतीवर थेट
संकट ओढावू शकते.
भारताची चिंता :
चीन धरणाद्वारे तब्बल ४० अरब घन मीटर पाणी रोखू शकतो.
यामुळे भारतातील ब्रह्मपुत्र नदीसह इतर नद्यांच्या प्रवाहात मोठी घट येऊ शकते.
स्थानिक शेतकऱ्यांचा दावा आहे की, या प्रकल्पामुळे शेतीचे नुकसान होईल व पाण्याचा पुरवठा खंडित होईल.
चीनचा दावा :
नदीचा प्रवाह धरणामुळे बदलणार नाही.
प्रकल्प फक्त ऊर्जा निर्मितीसाठी असल्याचा चीनचा आग्रह.
मात्र, भारत सरकार या विषयावर सजग असून २००० पासून या परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पर्याय शोधत आहे. अरुणाचल प्रदेशातील स्थानिकांनी
आधीच अशा प्रकल्पांना विरोध दर्शवला आहे.
दरम्यान, चीनने जगभरातील देशांसाठी दुर्मिळ खनिजांवर बंदी घातली असली तरी, भारतासाठी मात्र ही बंदी उठवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे
एकीकडे मैत्रीचा हात पुढे करणारा चीन, तर दुसरीकडे भारताच्या नद्यांवर कुरघोडी करणारा चीन अशी दुहेरी भूमिका स्पष्ट होत आहे.
आता भारत सरकार चीनच्या या हालचालींना कशा प्रकारे उत्तर देते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.