अकोल्यातील गुडधी परिसरात आज अवैध दारू विक्रेत्यांविरोधात महिलांचा संताप फुटला.
परिसरातील महिलांनी थेट अवैध दारू विक्रेत्यांच्या घरासमोर मोर्चा काढत जोरदार आंदोलन छेडले.
महिलांचा संताप उफाळला
गेल्या अनेक दिवसांपासून परिसरात अवैधरित्या दारू विक्री सुरू असल्याच्या तक्रारी होत होत्या.
मात्र याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने अखेर महिलांनीच पुढाकार घेतला
संतप्त महिलांनी दारू विक्रेत्यांच्या दुकानात घुसून तोडफोड केली. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली.
पोलिसांचा हस्तक्षेप
महिलांच्या या कारवाईमुळे परिसरात तणाव निर्माण झाला होता. दरम्यान पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मध्यस्थी केली आणि वाद निवळला.
पुढील अनर्थ टाळण्यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
नागरिकांचा प्रश्न
स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे की, दारूमुळे अनेक कुटुंबांचे संसार उद्ध्वस्त होत आहेत.
त्यामुळे प्रशासनाने तातडीने कारवाई करून अशा अवैध धंद्यांना आळा घालावा, अशी मागणीही परिसरातून होत आहे.