अकोला : पोलीस प्रशिक्षण केंद्र अकोला येथे मागील काही दिवसांपासून सुरू असलेले होमगार्डचे कठोर प्रशिक्षण शनिवारी
(दि. २३ ऑगस्ट) यशस्वीरीत्या पूर्ण झाले. या बॅचमधील तब्बल ८४१ जवानांनी प्रशिक्षण पूर्ण करत शिस्तबद्ध पद्धतीने निरोप
घेतला. प्रशिक्षण संपल्यानंतर जवानांना मोठ्या आनंदाने घरी परतण्याची संधी मिळाली.
अकोला रेल्वे स्थानकावरून हे जवान आपल्या गावी रवाना झाले. रेल्वे स्थानकावर कडक शिस्तीचे पालन करताना,
आनंदी चेहऱ्याने घरी परतणाऱ्या जवानांचे दृश्य पाहून वातावरण भारावून गेले.
कठोर प्रशिक्षणानंतरचा हा आनंदाचा क्षण सर्वांच्या मनाला स्पर्शून गेला.