पोळ्याच्या दिवशी घडली होती घटना; वंदे मातरम आपत्कालीन पथकाचे यश
मुर्तिजापूर (जि. अकोला) :- अकोल्याच्या मुर्तीजापूर तालुक्यातील खोळद गावातील शेतकरी युवक शंतनू अविनाश मानकर
(रा. खोळद) याचा मृतदेह अखेर आज मिळाला. पोळ्याच्या दिवशी आपली बैलजोडी घेऊन पेढी नदीवर गेलेल्या शंतनूला वाहत्या पाण्याने वाहून नेले होते.
घटनेनंतर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी संदीप साबळे तसेच तहसीलदार शिल्पा बोबडे यांच्या
सूचनेनुसार कुरणखेड येथील वंदे मातरम आपत्कालीन शोध व बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले होते.
बोटीच्या सहाय्याने शोधमोहीम सुरू होती.शोधमोहीमेदरम्यान नदीपात्रात जवळपास पाच ते सहा किलोमीटर अंतरावर मृतदेह आढळला.
अखेर या पथकाला मृतदेह शोधण्यात यश आले. घटनेमुळे खोळद व परिसरात शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
दरम्यान, मृतदेह पुढील तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात रवाना करण्यात आला आहे.
Read also : https://ajinkyabharat.com/patur-nandapuramadhye-haranatache-mass-vergriwar-raid-accused-seized/