कळंबी महागाव- आज दिनांक (दि .22) रोजी कळंबी महागाव येथे पोळा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
या दिवशी गावातील सर्व बैलांना सुंदर सजवण्यात आले.
सणाच्या प्रारंभी बुद्ध विहार येथे सर्व गावातील बैल एकत्र आले, जिथे शेतकऱ्यांनी महादेवाचे गाणे गायले.
त्यानंतर बैल हनुमान मंदिर (पारा) येथे एकत्र करून पारंपरिक विधींचा कार्यक्रम पार पडला.
त्यानंतर बैलांना बस स्टँडवर घाट लावून शांततेत सण साजरा करण्यात आला.
या सणात जगाचा पोशिंदा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शेतकरी व त्याच्या बैलाच्या मेहनतीचा गौरव करण्यात आला.
भारत कृषिप्रधान देश असल्याने वर्षाकाठी बैलपोळा उत्सव संपूर्ण देशभर मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.
सणात गावातील पोलीस पाटील, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, प्रतिष्ठित नागरिक आणि सर्व गावातील शेतकरी व लहान थोर मुलं उपस्थित होते.