आस्की कॉम्प्युटर्स येथे एमकेसीएल चा रौप्य महोत्सवी स्थापना दिवस मोठ्या उत्साहात संपन्न

रौप्य महोत्सवी

अकोट- पुणे येथे एमकेसीएल चा रौप्य महोत्सवी स्थापना दिवस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री अजित पवार,उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत

पाटील,माहिती तंत्रज्ञान मंत्री अँड.आशिष शेलार,माजी विधानसभा अध्यक्ष तथा आमदार दिलीप वळसे-पाटील,एमकेसीएलचे अध्यक्ष डॉ.अनिल

काकोडकर,डॉ.विजय भटकर,मुख्य सल्लागार डॉ.विवेक सामंत,व्यवस्थापकीय संचालक समीर पांडे यांच्या उपस्थितीत पुणे येथे साजरा झाला.सदर कार्यक्रम

आस्की कॉम्प्युटर्स येथील विद्यार्थ्यांना व आमंत्रित मान्यवरांना सुद्धा बघता यावा यासाठी मोठ्या पडद्यावर कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण करण्यात आले

होते.उपस्थितांनी पुणे येथे सुरु असलेल्या कार्यक्रमातील मान्यवरांचे विचार ऐकले.सदर कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून पत्रकार संतोष विनके आणि आई

तुळजाई महिला बचत गटाच्या अध्यक्षा रोहिणी वाटाणे,सचिव लता शिंदे,मनीषा गीते,दर्शना राऊत,सुषमा गीते,रेणुका बेराड,माया गावंडे,मेघा बोरकर,जयश्री

ठाकरे,दिपाली मानकर,किरण मानकर या उपस्थित होत्या. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी संस्थेची सुंदर सजावट केली होती.कार्यक्रम यशस्वीतेसाठी नितीन झाडे यांच्या

मार्गदर्शनात,दर्शना राऊत,विनिता पाचकवडे,श्रुती हिरूळकर,रंजना लिल्हारे,चेतन मदन सावळे,यांनी अथक परिश्रम घेतले.

Read also : https://ajinkyabharat.com/blood-mole/